प्रभुणे कुटुंब मूळचे पुणे जिल्ह्यातील सासवड तालुक्यात असलेल्या मावडी पिंप्री येथील राहणारे. अगस्ति गोत्रीय देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. डॉ. चिंतामण पांडुरंग प्रभुणे यांच्या पासूनची माहिती अशी :

डॉ. चिंतामण पांडुरंग प्रभुणे इ. स. १९२० मध्ये निझाम राज्यातून डॉक्टर झाले. सरकारी डॉक्टर या नात्याने त्यांची सर्व नोकरी निझाम राज्यात झाली. सेवानिवृतीनंतर ते औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे स्थायिक झाले.
अरुण हा प्रभुणे घराण्याचा वंशज. अरुणच्या पत्नीचे नाव उषा. अरुण-उषा यांना मुले दोन. चि. उदय व चि. सत्यव्रत. उदयच्या पत्नीचे नाव सौ. प्रज्ञा. सत्यव्रतच्या पत्नीचे नाव सौ. श्रुती. उदयला दोन अपत्ये. एक मुलगी. एक मुलगा. मुलीचे नाव रेवा. मुलाचे नाव रवी. सत्यव्रतला मुले दोन. तेजस व ओजस. असा हा वंशविस्तार. डॉ. अरुण चिंतामण प्रभुणे हे आज कुटुंबप्रमुख.

डॉ. अरुण प्रभुणे यांची उदय व सत्यव्रत ही दोन्ही मुले अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होजे या गावी राहतात. एका घरात. एक आदर्श एकत्र कुटुंब म्हणून सर्व परिचित या कुटुंबाला ओळखतात.