सकाळ, सप्तरंग पुरवणी, रविवार, ऑक्टोबर २६, २००३

सीते, तू लक्ष्मणरेखा का ग ओलांडलीस
दिराला दिलेले वचन तेव्हा तू का विसरलीस
विसरण्याची शिक्षा तुला जबरदस्त मिळाली
आग्निपरीक्षेची वेळ तुझ्यावर आली.
एवढ्याने तुझे भोग संपले नाहीत
वनवासी होतीस, ती परत वनवासी झालीस
जेव्हा पुनर्मीलनाची वेळ आली तेव्हा तू
जिथून आलीस तेथेच परत गेलीस

काय गं हे तुझे आयुष्य
सगळ्यांनी तुझी दया करावी
धर्माचे नीतिनियम आम्ही पाळावेत की पाळू नयेत
अशीच आमची द्विधा मनःस्थिती व्हावी

सौ. उषा प्रभुणे
उदगीर, भारत
रविवार, ऑक्टोबर २६, २००३

© २००३ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2003 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com