हा योग असा का यावा
हिमालया तुझ्या आधी मी
पाहिले तुझ्या भावा
विराट रूप पाहुनी त्याचे
अचंबित मी झाले
आधी घाबरले पण मग
मी त्याच्या प्रेमातच की रे पडले
आधी दुरुनी पाहिले
मग हळूच जवळी गेले
स्पर्श त्याला करता
मी मोहरुनी की रे गेले
बर्फावरती त्याच्या मी
खेळले, पडले, घाबरले
आनंदाने नुसते मी भरुनी
तेथे पावले
मन व्याकुळ होई येथुनी जाता
आठवणी जपून ठेवणे
हेच आहे माझ्या हाता

सौ. उषा प्रभुणे
उदगीर, भारत
नोव्हेंबर २००५

© २००५ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2005 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com