गोपाळकृष्ण आला घरी
आनंद झाला खरोखरी
ताक करा गं लवकरी
लोण्याचा गोळा द्या हातावरी
लोण्याचा गोळा खाल्ला गं
लबाड बाळकृष्ण हसला गं
मित्र खूप जमविले
खेळुनी ते दमून गेले
भूक लागली सणकून
खाऊ खाल्ला दणकून
संध्याकाळच्या वेळी
दिवा लावला देवा जवळी
भजन सगळ्यांनी म्हणले गं
गुंगुनी सगळे गेले गं
कृष्णाने बासरी वाजवली
सगळ्यांची समाधी लागली
गोपाळकृष्ण आला घरी
आनंद झाला खरोखरी

सौ. उषा प्रभुणे
सनिवेल, अमेरिका
गुरुवार, मे ६, २००४

© २००४ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2004 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com