रोज नवीन दिवस उगवतो
वाट पाहायला लावतो
आजी पणतू पणतू करीत शेवटी गेल्या
म्हणून वाटते कन्यारत्न होणार आता प्रज्ञाला
वाटते शेगावची पोथी वाचताना
आपणही पदर पसरावा भीक मागताना
पणतू व्हावा आजींच्या मनासारखा
नाव हेठू आम्हीही ‘भिकू’ असे मी विनवते महाराजांना
सोन्याची फुले उधळू आजींच्या फोटोवर
मनासारखे झाले म्हणून आजी हसतील खरोखर.

सौ. उषा प्रभुणे
सॅन होजे, अमेरिका
रविवार, फेब्रुवारी १८, २००१

© २००१ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2001 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com