तीर्थक्षेत्री मी जाऊन येते
देवाला डोळे भरून पाहते
तेथे मी तुझे भजन म्हणते
मन माझे आनंदी होते.
घरी जेव्हा मी परत येते
घर मज मंदिर भासते.
काय करू रे देवा
अजूनही मी संसारी रमते.
पतीमध्ये मी देव पाहते
तेथेच मला तुझे रोज दर्शन होते.
सगळे मज नावे ठेविती
संसारापासून थोडे दूर हो म्हणती.
खरे काय ? खोटे काय ?
हे देवा आता तूच ठरव.

सौ. उषा अरुण प्रभुणे
उदगीर, भारत
नोव्हेंबर २००६

© २००६ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2006 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com