झोप झोप रे बाळा तू झोप, झोप, झोप
आजी बाळाला झोपवते
छान छान कविता करत बसते.
दुलईत घेऊन मस्त झोपते
आई बाळाला दुदू पाजते
बाळाकडे पाहात खुदूखुदू हसते.
बाबा बाळाला घेतात
दंगामस्ती करत बसतात.
काका बाहेरून येतो
गो ग्गोऽऽड कोण आहे म्हणतो !

सौ. उषा प्रभुणे
सॅन होजे, अमेरिका
शनिवार, जून २, २००१

© २००१ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2001 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com