होळीचा सण आला रे
रंग घेऊनी आला रे
रंगांची उधळण झाली रे
चिंब भिजुनी मी गेले रे
नाचनाचुनी मी थकले रे
हसून हसून मी दमले रे
रंग साऱ्या अंगभर
ओळखू येईना कणभर
तेवढ्यात आली पावसाची सर
सगळे रंग घेऊनी निघुनी गेली भरभर
माझ्याकडे मी पाहिले
स्वच्छ कशी झाले याचेच नवल करत राहिले.
राधा-कृष्णाची होळी अशीच असेल का ?
रंगून सुध्दा स्वच्छच वाटत असतील का ?

चि. रेवा रंगपंचमीच्या दिवशी गोल फिरत नाचत होती. त्यावरुन सुचलेली कविता. रवीचा रंगपंचमीसण.

सौ. उषा प्रभुणे
सनिवेले, अमेरिका
सोमवार, मार्च २०, २००६

© २००६ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2006 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com