अमेरिका देशी जाऊन आले
स्वर्ग स्वर्ग काय म्हणतात ते पाहुनी आले.
एकेक गोष्ट पाहता कथा होईल त्याची सांगता
निसर्गाने दाखवावेत किती चमत्कार
वाटते करावा त्याला नमस्कार
पाहुनी बुद्धीची उत्तुंग भरारी
मस्तक झुकले आपोआप अत्यादरी
भ्रष्टाचार कसा तो न येथे दिसे
सर्व कसे शिस्तीत चालतसे
पोलिसास पाहुनी मागुता
घाबरे सर्व मनी जनता
आनंद घेती सर्व जन भरपूर करुनी काम
वाटे वास्तव्य करावे येथेच आता
परि मन मात्र जातसे आपुल्या देशा
भ्रष्टाचार सोडुनी जाता बुद्धीला न्याय देता
भारत देश वर येईल पाहता पाहता
म्हणतात, सोन्याचा धूर निघत होता कोणे एके काळी भारतात
येईल का परत तो सुदिन पाहणे आपुल्या आयुष्यात ?

सौ. उषा प्रभुणे
सॅन होजे, अमेरिका
शुक्रवार, ऑगस्ट २५, २०००

© २००१ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2001 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com