पिंडीतल्या शंकराने दर्शन मला दिले
नवऱ्यावर रागावू नकोस म्हणून मला सांगितले
खरे सांगते, देवाने सांगितले नसते तरी
मी तुझ्यावर रागावले नसते
वाईट मात्र वाटले एवढे तुला सांगते
तुझ्याशी बोलल्यावर मन शांत झाले
परत परत सांगते मी वेगळी नाही
एवढे मात्र समजले.

सौ. उषा प्रभुणे
उदगीर, भारत
रविवार, फेब्रुवारी ३, २००८

© २००८ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2008 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com