दोन मनांच्या मीलनात
फुले उमलतात
सुगंधाचा तुमच्यावर
शिडकावा करतात.

दोन मनांच्या मीलनात
तारा झंकारतात
संगीताचा मधुर
निनाद करतात.

दोन मनांच्या मीलनात
स्वर्गाचे दर उघडते
नंदनवन तुमचे
आनंदाने स्वागत करते.

सौ. उषा प्रभुणे
उदगीर, भारत
बुधवार, मे १४, २००३

© २००३ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2003 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com