भारतात जायचे दिवस जवळ आले
नातीला सोडून जायचे जिवावर आले
आता तिचा आवाज फोनवर ऐकायचा
आता तिचा फोटो पाहायचा
परत भेटेल तेव्हा ओळखणार नाही
आमच्या जवळ ती येणार नाही.
जेव्हा ती बोलायला लागेल
हळूच आजी आजोबा म्हणून हाक मारू लागेल
आमचे मन आनंदाने भरून वाहू लागेल
किती कौतुक करू असे वाटू लागेल.

सौ. उषा प्रभुणे
सॅन होजे, अमेरिका
गुरुवार, जून २८, २००१

© २००१ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2001 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com