नवऱ्याशी माझे भांडण झाले
टी.व्ही.च पाहायचा म्हणाले
टी.व्ही. समोर बसले
एकेक चॅनलचे बटण दाबत बसले
एकही चॅनल भावेना
टी.व्ही. पाहावा वाटेना
रुसलेल्या नवऱ्याकडे गेले
‘तुझेच खरे रे’ म्हणाले
नवरा हसत म्हणाला
पन्नास वर्षांची झालीस
पण अजूनही लहानच राहिली !

सौ. उषा प्रभुणे
उदगीर, भारत
जानेवारी, २००३

© २००३ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2003 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com