तेजस, रवी, ओजस जन्मा आले
जणू ब्रह्मा, विष्णु, महेश घरी आले
गरुडेश्वरचे दत्तगुरूच घरी अवतरले.
पाहुनी अवखळपणा रेवाचा
भास होई नर्मदेचा.
आजचा दिवस सोनियाचा असे
नातवाचे आमच्या बारसे असे
सॅन होजे जणू गरुडेश्वर झाले
आशीर्वाद द्याया वासुदेव आले.
पाहुणे सगळे जमले
आनंदाचा क्षण अनुभवू लागले.

सौ. उषा प्रभुणे
सॅन होजे, अमेरिका
मंगळवार, डिसेंबर १, २००९

© २००९ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2009 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com