राम आणि लक्ष्मण जसे
उदय आणि सत्यव्रत तसे
भावाभावांचे नाते जन्मोजन्मीचे असे.
एकमेकांचे हात हातात धरिती
गर्दीतुनी वाट काढिती
चांगला रस्ता शोधुनी काढिती
लक्ष असे डोंगर चढावयाचे
खाचखळगे तेथे किती हो असावयाचे
दमछाक त्यांची होतसे
कसे हो त्यांचे व्हावयाचे
पण त्यांना त्याचे काही न वाटतसे
पडले तरीही चढतांना ते आम्हा दिसतासे
जेव्हा रस्ता मोकळा स्वच्छ होई
आनंदाने आता ते बोलती
बाबा हो बाबा, आई ग आई
तुमचे आशीर्वाद पाठीशी असती
मग काय कमी हो आम्हासी ?

सौ. उषा प्रभुणे
उदगीर, भारत
सोमवार, ऑक्टोबर २९, २००१

© २००१ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2001 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com