झोप बाळा, झोप बाळा, झोप झोप रे.
काय हवे तुज सांग रे मजशी,
आणून देईन मी रे तुजशी.
झोप बाळा, झोप बाळा, झोप झोप रे.

चांदोबा मज ग आणून देशी,
चेंडू रे मी देईन तुजशी.
चांदोबा समजून चेंडूशी तू खेळ खेळ रे,
झोप बाळा, झोप बाळा, झोप झोप रे.

चांदण्या मज ग आणून देशी,
लाह्या रे मी देईन तुजशी,
चांदण्या समजून लाह्यांशी तू खेळ खेळ रे,
झोप बाळा, झोप बाळा, झोप झोप रे.

आता तू जर झोपला नाहीस,
आई तुझी रे झोपून जाईल,
मग तू एकटाच खेळ खेळ रे,
झोप बाळा, झोप बाळा, झोप झोप रे.

सौ. उषा प्रभुणे
सनिवेले, अमेरिका
सोमवार, मे २२, २००६

© २००६ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2006 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com