सावळ्या श्रीहरी
थांबव तुझी बासरी
क्रोधित जमावाला शांत कर
लागलेल्या वणव्याला शांत कर
कृष्णावतारी तू युद्ध सुरू केले
नवीन अवतार घेऊन
आता ते समाप्त कर
जातिव्यवस्था नष्ट कर
मानवतावादी जग सगळ्यांना दाखव
सगळे जग जवळ येऊ देत
आनंदाने जगू देत

सौ. उषा प्रभुणे
उदगीर, भारत
नोव्हेंबर, २००५

© २००५ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2005 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com