आषाढ आला श्रावण आला
धरतीने जणू हिरवा शालू नेसला
नववधू ही सजली,
वाट प्रियाची पाहू लागली.
मेघराजा आला आला,
धरतीला सुखवुनी गेला.
धरती आमची फुलली फळली
तृप्त होउनी हसू लागली.

सौ. उषा प्रभुणे
उदगीर, भारत
शुक्रवार, जुलै ५, २००२

© २००२ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2002 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com