स्विंग आमचे छान दिसते
बॅटरीवर ते चालत असते
बाळराजा त्यात पहुडतो
आईची अंगाई ऐकत पडतो
अंगाई ऐकून चांदोमामा येतो
बाळाबरोबर खेळत राहतो
दमून आमचा बाळराजा झोपतो
चांदोमामा त्याला टाटा करतो

सौ. उषा प्रभुणे
सनिवेल, अमेरिका
शुक्रवार, मार्च २६, २००४

© २००४ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2004 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com