मी काळी, तुम्ही गोरे
तरी एकमेकांचे आपण झालो कसे
हे सांगाल का बरे ?

मी सायन्सची, तुम्ही आर्टस् चे
तरी एकमेकांचे हात हातात आले कसे
हे सांगाल का बरे ?

मी मनाने पूर्ण कोरडी, तुम्ही मनाने पूर्ण भरलेले
तरीसुद्धा भिजून आपण चिंब झालो कसे
हे सांगाल का बरे ?

सौ. उषा प्रभुणे
सनिवेल, अमेरिका
गुरुवार, जानेवारी ८, २००४

© २००४ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2004 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com