येरे येरे पावसा
पण पड पड रे दिवसा.
पाऊस खूप घेऊन ये
शाळा माझी बुडू दे.

घरी खेळायला मजा येईल
अभ्यासाची कट-कट जाईल.
शाळेचा गृह-पाठ कालच झाला
खेळू दे रे आज आम्हाला.

संध्याकाळी बाबा येतील
भजी गरम दे ग् म्हणतील.
तुझ्यामुळे हे सगळे होईल
सांगितल्या प्रमाणे तू जर येशील.

घरभर आमचा पसारा होईल
आई आवरून दमून जाईल
आमच्याशी ती रागावून बोलेल
तुला मात्र समजावून सांगेल

पावसा रे पावसा
येऊ नकोस दिवसा.
मुलांची शाळा भरू दे
विश्रांती माझी होऊ दे.

सौ. उषा प्रभुणे
सॅन होजे, अमेरिका
मंगळवार, मार्च, २, २०१०

© २०१० सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2010 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com